
सातारा, २३ मार्च (वार्ता.) – वाढे फाटा ते वेण्णा नदी पूल या अंतरामध्ये लुटमारीच्या घटना वाढत आहेत. १९ मार्चच्या रात्री संतोष उबाळे यांना ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून भ्रमणभाष, रोख रक्कम आणि पॅन्ट काढून घेतली. वाढे फाटा येथे वाहतूक पोलीस कर्मचारी असतात; मात्र सायंकाळी ६ नंतर येथे कुणीही नसते. त्यामुळे चोरांचे चांगलेच फावते आहे. त्यामुळे पायी चालणार्या पादचार्यांसह दुचाकी वाहनांवरून प्रवास करणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढे फाटा परिसरातील वाढती गर्दी, राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलाखालील परप्रांतीय नागरिकांचा वाढता वावर यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस गस्त पथक (वाहन) आणि स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी वाढे फाटा परिसरातील नागरिक करत आहेत.
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात