श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या माध्यमातून धर्मवीर बलीदान मासानिमित्त प्रतिदिन श्रीशिव-शंभू मानवंदना उपक्रम !

मानवंदना देतांना पेण विभागातील शिवप्रेमी

पेण (जिल्हा रायगड), २३ मार्च (वार्ता.) – पू. भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात धर्मवीर बलीदान मास पाळण्यास शिवप्रेमींनी आरंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीशिव-शंभू मानवंदना उपक्रम करण्यासाठी पेण येथील शिवप्रेमी युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणार्‍या स्मारकाला मानवंदना देण्यासाठी प्रतिदिन एकत्रित येत आहेत. शिवरायांच्या प्रति आदर आणि वीरश्री निर्माण करणार्‍या श्‍लोकांचे पठण, तसेच जयघोष घेण्यात येतात, ही मानवंदना ११ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत नियमितपणे देण्यात येणार आहे. पुढे पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथींना असाच क्रम चालू असणार आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवले जाणारे अन्य उपक्रम

१. शिव स्मारकाची नित्य पंचोपचार पूजा

२. पेण सांक्षी गडावर होणारे धर्मांधांचे अतिक्रमण रोखण्यासाठी साप्ताहिक दुर्ग प्रदक्षिणा मोहीम

३. प्रतिमास गड स्वच्छता मोहीम

४. आदिवासी विभागातील हिंदूंना अन्नदानाच्या माध्यमातून साहाय्य