कोल्हापूर – दळणवळण बंदी कोणत्याही घटकाला परवडणारे नसल्याने कोल्हापुरात दळवळण बंदी करण्यात येणार नाही; मात्र कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
२२ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियोजनाविषयीच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. या वेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
१. प्रवासी क्षमतेनुसार वाहतूक व्हावी.
२. उपाहारगृह ५० टक्के क्षमतेनुसार चालवा.
३. खासगी रुग्णालयांनी खाटांची संख्या पडताळून ठेवावी. आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण व्हायला हवे.