(म्हणे) ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांचे त्यागपत्र घेण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही !’ – शरद पवार

आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांनीच स्वतः त्यागपत्र देणे आवश्यक होते; मात्र तसे त्यांनी केले नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा त्यांची पाठराखण करत आहेत, हे लज्जास्पद !

भारत, चीन आणि पाकिस्तान आतंकवादविरोधी कारवायांना सामोरे जाण्याच्या पद्धतींचा एकत्रित सराव करणार

यातून भारत आतंकवादाच्या विरोधात कसा लढतो, याची गुपिते पाक आणि चीन जाणून घेणार अन् ‘भारताचा कसा सामना करायचा’ हे पाक तेथील पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना शिकवणार !

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआयकडून चौकशी करा ! – परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

याचिकेत म्हटले आहे की, स्फोटकांच्या प्रकरणात अन्वेषण योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे याची मी निश्‍चिती केली होती. तसेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून होणार्‍या अन्वेषणात कोणताही अडथळा आणला नव्हता.

धर्मांधांकडून हिंदु तरुणींचे धर्मांतर करून विवाह करण्याच्या विरोधात कायदा बनवणार्‍या राज्यांचे आम्ही समर्थन करतो ! – संघाचे नवनिर्वाचित सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

हिंदु तरुणींचे प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करून विवाह करण्याच्या घटनेच्या विरोधात कायदा बनवणार्‍या राज्यांचे आम्ही समर्थन करतो. आगामी काळात संघ बौद्धिक अभियानातून याविषयी कार्य करील

आयकर परताव्यासाठी येणार्‍या संदेशाद्वारे बँकेतील पैसे लुटण्याचा प्रयत्न !

मार्चच्या शेवटापर्यंत आयकर विवरणपत्र भरण्यात येत असते आणि त्यानंतर परतावा (रिफंड) मिळवण्यात येतो. गेल्या काही काळापासून परताव्याचा हक्क सांगण्यासाठी एक संदेश येत आहे. अशा संदेशापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी ! – अतुल भातखळकर, भाजप

भातखळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी सामाजिक तेढ निर्माण करणार्‍या प्रवृत्ती बोकाळल्या आहेत. सातत्याने महापुरुषांचा अवमान करण्याचा सपाटा चालू आहे. हिंदूंच्या उत्सवावर निर्बंध आणले जात आहेत

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याकडून शिवचरित्राचे वाचकांना दिशा न देता त्यांचा वैचारिक गोंधळ निर्माण करणारे लेखन !

उचित मीडिया आयोजित सर्जनशील कट्टा या फेसबूकवरील कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्‍वर जाधव यांनी डॉ. श्रीपाल सबनीस यांची मुलाखत घेतली. वंचित आणि आदिवासी समाजासंदर्भात लेखन केल्याविषयी नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना शाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात आला.

वणवा लागल्याच्या प्रकरणी सातारा येथे मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंड

वाई तालुक्यातील रेणावळे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पार्टे आणि शिक्षिका नीलिमा खरात यांना वाई येथील न्यायालयाने प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. शाळेच्या आवारातील पालापाचोळा गोळा करून मुख्याध्यापक पार्टे आणि शिक्षिका खरात यांनी त्याला आग लावली.

उत्तर कोरियामध्ये घरामध्ये अश्‍लील चित्रपट पहाणार्‍या मुलामुळे संपूर्ण कुटुंबाला तडीपाराची शिक्षा !

भारतात अशा प्रकारच्या कठोर शिक्षा होत नसल्यानेच अश्‍लीलतेचे प्रमाण वाढत आहे, हे लक्षात घ्या !

वीजदेयक थकवल्यामुळे सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीजजोडणी तोडली

८५ सहस्र रुपयांचे वीजदेयक थकवल्यामुळे सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीजजोडणी वीज वितरणच्या कर्मचार्‍यांनी तोडली. सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयावरील ही पहिलीच कारवाई आहे.