वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात पश्‍चिम महाराष्ट्रात महावितरणची धडक कारवाई

वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा उपयोग करणार्‍या वीज चोरांविरोधात महावितरणने धडक कारवाई चालू केली आहे, अशी माहिती प्रादेशिक संचालक प्र. नाळे यांनी दिली. 

सातारा येथे शिवसेनेचे इंधन दरवाढीच्या विरोधात ढकल स्टार्ट आंदोलन

शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत इंधन दरवाढीविरोधात शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असे ढकल स्टार्ट आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी हाताने बंद गाडी ओढत आंदोलन केले.

कोरोनाचे नियम मोडणार्‍या मुंबई येथील ५७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर गुन्हे नोंद

आपत्कालीन स्थितीतही नियमांचे पालन न करणार्‍या जनतेची आपत्कालामुळे हानी झाली, तर त्याला ती स्वतःच उत्तरदायी असेल !

सीमावादाचा चिघळलेला प्रश्‍न !

जेव्हा एखादा प्रश्‍न सुटत नाही, तेव्हा पालक या नात्याने त्याचे दायित्व केंद्र सरकारकडेच येते. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी नरो वा कुंजरोवा अशी भूमिका न घेता पुढाकार घेऊन येथील मराठीजनांना दिलासा द्यावा, इतकीच सामान्य मराठीजनांची अपेक्षा आहे.

(म्हणे) ‘मी हिंदु आहे !’

नुसते ‘मी हिंदु आहे’, असे बोलून कुणी हिंदू होत नाही, तर कर्माने हिंदू होणे महत्त्वाचे आहे. मीना हॅरिस यांच्याकडून आतापर्यंत हिंदू बहुसंख्य असणार्‍या भारतावर टीका केली असून त्यांनी कधी हिंदु धर्माविषयी समर्थन करणारी विधाने केलेली नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

जामिनानंतर न्यायाधिशांच्या दूरभाषनंतर देवतांचा अवमान करणार्‍या फारूकी याची सुटका

‘हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणातील आरोपी फारूकी याला जामीन मिळूनही त्याची कार्यवाही न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाला थेट हस्तक्षेप करावा लागला, एवढी ही व्यक्ती महनीय होती का ?’, सर्वसामन्यांकरीताही असे केले जाईल का ?’

भारताकडून अफगाणिस्तानला पाठवण्यात आल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसी !

एअर इंडियाच्या विमानाने मुंबई विमानतळावरून देहलीमार्गे अफगाणिस्तानची राजधानी काबूलला सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसींचे अनेक डोस पाठवण्यात आले आहेत.

‘मिर्झापूर’ वेब सिरीजमधून सून आणि सासरे यांच्यामध्ये शारीरिक संबंधांचे चित्रण

अनैतिकांचे घर झालेल्या वेब सिरीजवर आता कायमची बंदी घालण्याला पर्याय नाही, यासाठी धर्माचरणींचे हिंदु राष्ट्रच हवे !

टिकरी सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकर्‍याची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्‍याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे.

वेब सिरीजच्या नावाखाली ‘पॉर्न व्हिडिओ’चे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक

अश्‍लीलतेला प्रोत्साहन देणार्‍या वेब सिरीजवर बंदीच आणायला हवी !