भारताकडून अफगाणिस्तानला पाठवण्यात आल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसी !

अफगाणिस्तानची राजधानी काबूलला सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस

नवी देहली – भारताने बनवलेल्या दोन स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लसी श्रीलंका, भूतान, मालदीव या शेजारी देशांनंतर, तसेच मोरोक्को, ओमान, अल्जेरिया या आफ्रिकी देशांनंतर आता अफगाणिस्तानला पाठवण्यात आल्या आहेत. एअर इंडियाच्या विमानाने मुंबई विमानतळावरून देहलीमार्गे अफगाणिस्तानची राजधानी काबूलला सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसींचे अनेक डोस पाठवण्यात आले आहेत. काही देशांनी लसींसाठी भारताशी करार केला आहे, तर काही शेजारील देशांना लसींचे काही डोस भेट स्वरूपात पुरवले आहेत.