वेब सिरीजविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
अनैतिकांचे घर झालेल्या वेब सिरीजवर आता कायमची बंदी घालण्याला पर्याय नाही, यासाठी धर्माचरणींचे हिंदु राष्ट्रच हवे !
नवी देहली – ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजच्या विरोधात एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून यात दाखवण्यात आलेल्या सूनेचे सासर्यांशी असलेल्या शारीरिक संबंधांवर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच यात सुनेचे घरातील नोकरासमवेतही शारीरिक संबंध असल्याचे दाखवण्यात आले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने दिग्दर्शक आणि निर्माते यांना नोटीस बजावली आहे.
सुजीत कुमार सिंह यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मिर्झापूर हा देशातील एक समृद्ध प्रदेश आहे. येथे १०८ शक्तिपीठांपैकी एक असणारे श्री विंध्याचल मंदिर आहे. अशा मिर्झापूर शहरातील माहिलेचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. यातून शहराची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या मिर्झापूर शहराचे चित्र असे दाखवू नये, यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला सूचना द्याव्यात, अशी मागणी या या याचिकेत करण्यात आली आहे.