(म्हणे) ‘मी हिंदु आहे !’

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांचे त्यांना होणार्‍या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर

नुसते ‘मी हिंदु आहे’, असे बोलून कुणी हिंदू होत नाही, तर कर्माने हिंदू होणे महत्त्वाचे आहे. मीना हॅरिस यांच्याकडून आतापर्यंत हिंदू बहुसंख्य असणार्‍या भारतावर टीका केली असून त्यांनी कधी हिंदु धर्माविषयी समर्थन करणारी विधाने केलेली नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस

वॉशिंग्टन (अमेरिका) – मी हिंदु आहे. फॅसिस्टवाद लपवण्यासाठी धर्माचा वापर करणे तुम्ही बंद करा, अशी टीका अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनी ट्वीट करत केली आहे. त्यांनी संक्रांत साहू या धर्मप्रेमीच्या ट्वीटला प्रत्युत्तर देतांना ही टीका केली. मीना हॅरिस यांनी शेतकरी संघटनांच्या समर्थनार्थ प्रथम ट्वीट केले होते. त्यावर टीका करतांना साहू यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की, तुमचा हिंदूद्वेष दाखवण्यासाठी आभारी आहोत. तुम्ही हिंदूंचा द्वेष करता; कारण तुम्हाला ते विरोध करतात.’