काँग्रेसशासित राज्यांतील शेतकर्‍यांकडून होणारे आंदोलन कृषी कायद्याविरोधात नाही, तर सीएए, एन्.आर्.सी. आणि श्रीराममंदिराचे दुःख ! – साक्षी महाराज, खासदार, भाजप

उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनावर केली.

सामाजिक न्याय !

याच देशात मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी प्रभु श्रीराम यांनीही राज्य केले आहे. आदर्श राज्यकारभाराचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला आहे. कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे सध्याचे राजकारणी ? यावरून तरी देशात रामराज्याची अर्थात् हिंदु राष्ट्राची का आवश्यकता आहे, ते लक्षात येते !

कोरोनाचे दूरगामी परिणाम…!

मानसिक स्वास्थ्य कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्यासाठी मनोविकारतज्ञ काही सूचना देणे, मार्गदर्शन करणे इत्यादी करू शकतात; मात्र या सर्वांवर एकमेव परिणामकारक उपाय आहे आणि तो म्हणजे जीवनाकडे सकारात्मकतेने पाहून मनोबल उंचावण्यासाठी काळानुसार साधना करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे.

तुर्कस्तानमधील १ सहस्र प्रेयसी असणार्‍या मुसलमान धर्मगुरूला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी १ सहस्र ७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

ख्रिस्त्यांच्या वासनांध पाद्रयांच्याही कितीतरी पाऊल पुढे असलेले धर्मांध धर्मगुरु ! हिंदूं संतांची नाहक अपकीर्ती करणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?

‘हलाल’ म्हणजे ‘हालहाल’ सर्वच क्षेत्रात धर्मांध करतात, हेही थांबवा !

‘केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने ‘अ‍ॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढला आहे.’

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुणे येथील भक्त डॉ. (सौ.) पूजा जोशी यांचे दीर्घ आजाराने निधन

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे येथील भक्त कै. दत्तात्रय जोशी यांच्या सून डॉ. (सौ.) पूजा प्रशांत जोशी (वय ५६ वर्षे) यांचे ८ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

मकरसंक्रांत

हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी प्रति ८० वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी आहे.

आजचा वाढदिवस : चि. श्‍लोक हाके

पौष शुल्क पक्ष प्रतिपदा (१४.१.२०२१) या दिवशी महाळुंग (जिल्हा सोलापूर) येथील ५० टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्‍लोक केशव हाके याचा तिथीनुसार प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चीनने लडाख सीमेवरून १० सहस्र सैनिक मागे घेतले !

चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र  सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत.

काँग्रेसींकडून आणखी कसली अपेक्षा करणार ?

‘नथुराम गोडसे भारतातील पहिला आतंकवादी आहे’, असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना ‘काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकली आहे’, असे प्रत्युत्तर भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिले आहे.