बिंदूदाबनाचे उपचार केल्यावर कु. आरती सुतार यांना जाणवलेले पालट

मला पुष्कळ वेदना व्हायच्या. देव मला वेदना सहन करण्याची शक्ती द्यायचा; पण काही वेळा मला वेदना सहन व्हायच्या नाहीत. मला रडू यायचे आणि डोळ्यांत पाणी आल्याने मला सर्दी व्हायची.

प्रदर्शन आवरतांना तेथे ठेवलेला आरसा हलणे, त्या माध्यमातून तो साधिकेशी बोलत असल्याचे आणि तिच्याकडे पहात असल्याचे जाणवणे

‘आरसा म्हणजे माझा कृष्ण आहे’, असा भाव ठेवून प्रदर्शन आवरतांना कृष्णाशी खेळायचे. मी पुनःपुन्हा त्या आरशामध्ये बघायचे आणि आरसा (कृष्ण) दुसर्‍या बाजूने बघायचा. त्यामुळे कृष्ण जिंकत असे आणि मी हरत असे; पण आज उलटच झाले. आरसा माझ्याकडे बघायला लागला आणि मी आरशाकडे, म्हणजेच कृष्णाकडे बघू लागले. त्याला मी घरून आल्याचा पुष्कळ आनंद झाला होता.