गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ।
कधी वाटते तुमच्या अखंड स्मरणातच रहावे ।
गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ॥
कधी वाटते तुमच्या अखंड स्मरणातच रहावे ।
गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ॥
गुरुमाऊलीने जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले । आणखी थोर भाग्य ते काय असावे ॥
‘सुतार’ कुटुंब धन्य धन्य झाले । म्हणूनी श्री गुरुचरणी कृतज्ञतेचे बोल व्यक्त केले ॥
आक्रमक शक्तींपासून आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित होण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केले.
मंदिरासाठी मिळणार्या अर्पणाचा हिशोब मागण्याचा प्रत्येक हिंदूला अधिकार आहे; मात्र आजन्म मंदिराला विरोध करणार्या काँग्रेसला हा अधिकार आहे का ? काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या मंदिर होऊ नये, यासाठीच प्रयत्न केले होते, हे हिंदू विसरणार नाहीत !
श्रीनगर येथील आलमगिरी बाजारात जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलीस यांच्या वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणामध्ये एक पोलीस अन् एक नागरिक घायाळ झाले.
बेंगळुरू (कर्नाटक) येथे यावर्षी ११ ऑगस्टला धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणातील पसार असणार्या काँग्रेसच्या रकीब जाकीर या नेत्याला पोलिसांनी अटक केली.
छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धारातीर्थ यात्रा आयोजित केल्या जातात.
भारताच्या अंतर्गत प्रकरणांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार ब्रिटनच्या खासदारांना कुणी दिली ? भारतावर आता त्यांचे राज्य नाही, हे त्यांना ठाऊक नाही का ?