सर्व साधकांना आनंद मिळवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
कधी वाटते फूल व्हावे ।
आश्रमाच्या अंगणात आनंदाने डोलावे ॥ १ ॥
कधी वाटते व्हावे फुलपाखरू ।
गुरुदेवांच्या खोलीत आनंदाने बागडून यावे ॥ २ ॥
कधी वाटते वार्याची हळुवार झुळूक व्हावे ।
गुरुचरणांना स्पर्श करूनी वंदन करावे ॥ ३ ॥
कधी वाटते आश्रमातील होऊनी निर्मळ पाणी ।
अभिषेक करावा श्री गुरुचरणांवरी ॥ ४ ॥
कधी वाटते इवलासा धूलीकण व्हावे ।
गुरुचरणांशी समर्पित व्हावे ॥ ५ ॥
कधी वाटते होऊनी छोटीशी चिमणी ।
चिवचिव करूनी गुरुदेवांशी मधुर बोलावे ॥ ६ ॥
कधी वाटते गुरुदेवांच्या खोलीतील मऊ पायपुसणे व्हावे ।
गुरुचरणांचा चैतन्यदायी स्पर्श अनुभवावा ॥ ७ ॥
कधी वाटते तुमच्या अखंड स्मरणातच रहावे ।
गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ॥ ८ ॥
गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक (वय ९ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |