गर्भातच भूवैकुंठीचे (टीप १) निवासस्थान लाभले ।
अन् भूवैकुंठातील सर्व यज्ञ-याग पाहिले ॥ १ ॥
बालसंत पू. भार्गवरामांची बाललीला गर्भातच पाहिली (टीप २)।
जन्मापर्यंत चैतन्याच्या सागरात डुंबत राहिली ॥ २ ॥
लाभले कन्यारत्न गुरुकृपेने ।
‘प्रकाश-प्रचीती’ या दांपत्याला ॥ ३ ॥
तिच्या जन्माने सर्वांना आनंद झाला ।
म्हणूनी तिचा नामकरण सोहळा नाव ‘आनंदी’ ठेवूनी झाला ॥ ४ ॥
आनंदी काही मासांनी निजधामी भूवैकुंठी परतली ।
घेतले साधकांनी तिला सत्वर जवळी ॥ ५ ॥
तिच्या भेटीतून सर्वांना आनंदीआनंद झाला ।
तिचे विविध गुण पाहूनी ‘देव’ही हसला ॥ ६ ॥
जन्मानंतरही बालसंत पू. भार्गवरामांची थोरवी ओळखी ।
छायाचित्र त्यांचे बघूनी ‘दादा’ म्हणूनी बोट दाखवी ॥ ७ ॥
‘जय गुरुदेव’, ‘जय श्रीराम’ जयघोष करी ती हात उंचावूनी ।
साधकांच्या नमस्काराला प्रतिसाद देते नमस्काराची मुद्रा करूनी ॥ ८ ॥
पहिला वाढदिवस संतांसमक्ष वैकुंठात साजरा झाला ।
तेथेच गुरुकृपेचा अनमोल क्षण मिळाला ॥ ९ ॥
गुरुमाऊलीने जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले ।
आणखी थोर भाग्य ते काय असावे ॥ १० ॥
‘सुतार’ कुटुंब धन्य धन्य झाले ।
म्हणूनी श्री गुरुचरणी कृतज्ञतेचे बोल व्यक्त केले ॥ ११ ॥
टीप १ – सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाचे
टीप २ – चि. आनंदीने बालसंत पू. भार्गवराम यांच्यावरील ध्वनीचित्र-चकतीचे थेट प्रक्षेपण आईच्या गर्भात असतांनाच पाहिले.
(६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. आनंदी प्रकाश सुतार (वय १ वर्ष) हिच्या वाढदिवसानिमित्त साधिकांनी केलेली कविता)
– सौ. पार्वती जनार्दन आणि कु. रेणुका राणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |