मेरठ येथे विवाहित हिंदु महिलेची तिच्या मुलीसह हत्या करून त्यांना घरात पुरणार्‍या शमशाद याला अटक

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही ! – पंतप्रधान

मणिपूर येथे २३ जुलै या दिवशी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येक घरी पाणी’, या योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून बोलत होते. ‘हा प्रकल्प म्हणजे रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

बॉलिवूडवाल्यांचे पाप !

सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीचे सूत्र उपस्थित झाले असून काही नामांकित घराण्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता त्याही पुढे जाऊन बॉलिवूडमधील कलाकारांचे पाकची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आरोप होत आहेत.

भक्तीतील शक्ती !

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

जर्मनीतील एका राज्यात शाळेमध्ये बुरखा घालण्यावर बंदी

युरोपमध्ये अनेक लोकशाहीप्रधान देशांत अशी बंदी घालण्यात आली आहे, तर भारतात ती का घातली जाऊ शकत नाही ?

राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाच्या विनाशाला प्रारंभ होईल ! – मध्यप्रदेशचे हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा

५ ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाचा विनाश होण्यास प्रारंभ होईल, असे विधान मध्यप्रदेशातील हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा यांनी केले.

गोवा विधानसभेच्या २७ जुलै या दिवशी होणार्‍या पावसाळी अधिवेशनात प्रवेशासाठी अनेक निर्बंध

गोवा विधानसभेचे एकदिवसीय पावसाळी अधिवेशन सोमवार, २७ जुलै या दिवशी होणार आहे. या दिवशी विधानसभेत प्रवेश करण्यासाठी विधानसभा सचिवांनी अनेक निर्बंध घातले आहेत, तसेच नागरिकांना विधानसभेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

भगवान कार्तिकेय यांच्या भजनाचा अवमान करणार्‍या यू ट्यूब वाहिनीवर केलेल्या कारवाईसाठी अभिनेते रजनीकांत यांच्याकडून तमिळनाडू सरकारचे कौतुक

अभिनेते रजनीकांत यांनी भगवान कार्तिकेय (मुरुगन) यांच्या भजनाचा अवमान करणार्‍या ‘करूप्पर कूटम्’ या यू ट्यूब वाहिनीच्या विरोधात तमिळनाडू सरकारने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे.

तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा शासनाचा निर्णय

तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या योजनेअंतर्गत हे केंद्र उभारले जाणार आहे.

चातुर्मास्य (चातुर्मास)

सध्या ‘चातुर्मास’ चालू झाला आहे. चातुर्मासाचे महत्त्व, वैशिष्ट्ये काय आहेत? या काळात कोणती व्रते केली जातात ? आदींविषयीची माहिती आमच्या वाचकांसाठी क्रमशः देत आहोत.