सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा बसवण्यात यावी ! – मनसेची मागणी

जागतिक आरोग्य संस्था आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी मान्यता दिलेले ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर बसवावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.