निरोगी जीवनाचा कानमंत्र

‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणेें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’, असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे.

आहार कसा नसावा आणि कसा असावा ?

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.

तामसिक आणि राजसिक पेयांपेक्षा सात्त्विकता देणारी पेये घ्या !

अल्कोहोल आणि ब्लॅक टी यांसारख्या पेयांत सूक्ष्म-तम घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मानवावर नकारात्मक परिणाम होऊन त्याच्यातील तामसिकताही वाढते. जितके जास्त प्रमाण, तितका त्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो.

चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे.

देहातील तमोगुणाचा लय करणारा शाकाहार स्वीकारा आणि ईश्वरापासून दूर नेणारा मांसाहार करणे टाळा !

ईश्वराने सृष्टीची निर्मिती करतांना ‘कोणत्या जिवाने कोणता आहार ग्रहण करावा’, याचे नियम केले.