भगवान कार्तिकेय यांच्या भजनाचा अवमान करणार्‍या यू ट्यूब वाहिनीवर केलेल्या कारवाईसाठी अभिनेते रजनीकांत यांच्याकडून तमिळनाडू सरकारचे कौतुक

अभिनेते रजनीकांत

चेन्नई (तमिळनाडू) – अभिनेते रजनीकांत यांनी भगवान कार्तिकेय (मुरुगन) यांच्या भजनाचा अवमान करणार्‍या ‘करूप्पर कूटम्’ या यू ट्यूब वाहिनीच्या विरोधात तमिळनाडू सरकारने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे.

राजनीकांत यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘स्कंद षष्ठी कवचम्’ भगवान कार्तिकेय यांच्या सन्मानार्थ गायले जाते. या कवचाचा अवमान करून कोट्यवधी तमिळी लोकांच्या भावना दुखावण्यात आल्या. आता तरी धार्मिक घृणा आणि ईश्‍वराची निंदा बंद करावी.’