राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाच्या विनाशाला प्रारंभ होईल ! – मध्यप्रदेशचे हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा

रामेश्‍वर शर्मा

भोपाळ (मध्यप्रदेश) – त्रेतायुगात राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला. त्यामुळे ५ ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाचा विनाश होण्यास प्रारंभ होईल, असे विधान मध्यप्रदेशातील हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा यांनी केले. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन होणार आहे.