नागपूर जिल्ह्यातील काही गावांत मौल्यवान सोन्याचे साठे आढळले !

नागपूर – महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा, तसेच आता नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरूपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे आहेत; मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. तसा अहवाल भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिला आहे. त्याशिवाय इतर मौल्यवान धातूसाठे असल्याचेही सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यापूर्वी चंद्रपूर आणि भंडारा या २ जिल्ह्यांत सोन्याचे साठे सर्वेक्षणात आढळले आहेत. इतर मौल्यवान धातूसाठे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव आणि राजोली पेठगावाजवळील बामणी येथे भूगर्भात सोने असल्याचे केंद्र सरकारच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाला आढळले आहे.