विदेशी नागरिकालाही भारतातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

भारतामध्ये रहाणार्‍या विदेशी नागरिकालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. विदेशी नागरिक या कलमाच्या अंतर्गत भारतातील आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय कोलकाता न्यायालयाने दिला आहे.

तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २२ सहस्र ६५ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २१ सहस्र २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये अनुमाने २ सहस्र ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ लाख ७२ सहस्र २९ झाली असून उपचार करून बरे झालेल्यांची संख्या १ लाख १४ सहस्र ७१३ इतकी आहे.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरामध्ये दळणवळण बंदी असतांना मशिदीमध्ये नमाजपठण

डीबाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील अमर हमजा मशीद आणि सराय मशीद या दोन्ही ठिकाणी मुसलमान गुप्तपणे नमाजपठण करण्यास जात होते.

केरळमध्ये चहा वेळेत न दिल्याने कोरोनाबाधिताकडून परिचारिकेला मारहाण

कोरोनाबाधितांना ठेवलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (आयसोलेशन वॉर्डमध्ये) डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही समोर येत आहे.

रांची (झारखंड) येथे मदरशांमध्ये बलपूर्वक डांबून ठेवलेल्या ६०० विद्यार्थिनींची पोलिसांकडून सुटका

दळणवळण बंदी असतांनाही मुलींना मदरशात डांबले !

गोव्यात ३ कोरोनाबाधीत सापडले

गोव्यात विदेशातून आलेले ३ गोमंतकीय कोरोनाबाधीत असल्याचे त्यांच्या चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. हे तिघेही रुग्ण पुरुष आहेत. त्यातील एक रुग्ण २३ वर्षांचा, दुसरा २९, तर तिसरा रुग्ण ५५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी हे तिघे जण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्पेन या देशांतून गोव्यात आले होते.

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.

महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी

महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले.