उपराष्ट्रपती ९ जानेवारीला गोवा भेटीवर

उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू ९ जानेवारी या दिवशी गोवा विधानसभेच्या ‘विधीमंडळ दिवस’ कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी गोव्यात येत आहेत.

राजस्थान येथील श्री देवनारायण मंदिराच्या भूमीपूजनासाठी दूध, दही आणि तूप अशी एकूण ११ सहस्र लिटर सामुग्री वापरल्याने प्रसारमाध्यांची टीका

हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ते कृती करत असतील, तर प्रसारमाध्यमांना पोटशूळ का उठतो ?

पाकच्या सिंध प्रांतात हिंदु महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला सापडला

पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना जगभरातील हिंदू निष्क्रीय !

नवीन पालिका वटहुकूमाला अखिल गोवा व्यापारी संघटनेचा विरोध : ७ जानेवारीला दुकाने ‘बंद’ ठेवण्याची हाक

अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे.

प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणारच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील दुकानदारांकडून देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे १ जानेवारीपासून ही दुकाने खुली करण्यास अनुमती देण्यात आली. त्यामुळे मंदिराच्या आवारातील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने २ जानेवारी या दिवशी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.

भोसे (मिरज) येथील कांबळे कुटुंबियांनी घातले देशी गाईचे डोहाळे जेवण 

मिरज पंचायत समितीचे सदस्य कृष्णदेव कांबळे यांच्या आईवडिलांना मुलगी नव्हती. याची खंत त्यांना मनात नेहमी होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘लक्ष्मी’ नावाच्या देशी गायीचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला आहे. या गायीचा १ जानेवारी या दिवशी कांबळे कुटुंबियांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला.

‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या वतीने २०० हून अधिक जणांना विनामूल्य भोजन वाटप

‘महाराष्ट्र्र राज्य मराठी पत्रकार संघा’चे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे आणि राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या वतीने विनामूल्य भोजन वाटप करण्यात आले. २०० हून अधिक गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

भैरवनाथ मंदिराच्या (जिल्हा सांगली) जिर्णाेद्धारासाठी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून १ लाख १ सहस्र रुपयांचे साहाय्य 

सांगलीचे भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी केली होती. यानंतर १ जानेवारी या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांनी या जिर्णाेद्धारासाठी १ लाख १ सहस्र रुपयांची देणगी मंदिराच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केली.