भैरवनाथ मंदिराच्या (जिल्हा सांगली) जिर्णाेद्धारासाठी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून १ लाख १ सहस्र रुपयांचे साहाय्य 

सांगली – बामणोली गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या नियोजित आणि नवीन बांधकामाची पहाणी दोनच दिवसांपूर्वी सांगलीचे भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी केली होती. यानंतर १ जानेवारी या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांनी या जिर्णाेद्धारासाठी १ लाख १ सहस्र रुपयांची देणगी मंदिराच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केली. या वेळी मंदिराचे विश्वस्त श्री. सावळाराम शिंदकर, बामणोली गावचे सरपंच श्री. राजेश सन्नोळी, उपसरपंच श्री. प्रकाश घुटूगडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. रवींद्र मोहिते यांसह अन्य उपस्थित होते.

भैरवनाथ मंदिराच्या जिर्णाेद्धारासाठी १ लाख १ सहस्र रुपयांची वर्गणी देतांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडे) आणि मंदिराचे विश्वस्त, तसेच अन्य
ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या नियोजित बांधकामाचा आराखडा
नियोजित मंदिराच्या बांधकामाची पहाणी करतांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ