माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी
सातारा, ३ जानेवारी (वार्ता.) – शिखर बँकेने ३ कोटी रुपयांचा हप्ता थकवला या कारणासाठी चालू स्थितीतील श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात काढला. त्या वेळी आमच्या संस्थेची शिखर बँकेकडे धनलक्ष्मी ठेव योजनेमध्ये ८ कोटी ३४ लाख रुपये रक्कम जमा असतांना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. ही गोष्ट पूर्णत: अवैध असून यामध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहकारातील कोणतीही निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा, माजी आमदार डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.