हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या मुनव्वर फारूकी याला अटक

आता जलद गतीने खटला चालवून अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी जकी-उर-रहमान लखवी याला पाकमध्ये पुन्हा अटक

पाकने आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी जकी-उर-रहमान लखवी याला पुन्हा एकदा अटक केली आहे. त्याला मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाच्या प्रकरणी जामिनावर सोडण्यात आले होते.

गोवामुक्ती लढ्यात सीमावर्ती भागाची निर्णायक भूमिका ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

गोवामुक्ती लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या दोडामार्ग येथील स्वातंत्र्यसैनिकांची गोवा शासन दरबारी नोंद होण्यासाठी ‘भारतमाता की जय’ ही संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

पोलीस गोळीबार सरावाच्या पार्श्‍वभूमीवर सतर्क रहाण्याचे आवाहन

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने येथील गोळीबार मैदानावर (फायरिंग बट) गोळीबार सराव करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात लोकांनी जाऊ नये, तसेच प्राणी आदींनाही नेऊ नये.

कोलकाता येथे २२ गावठी बॉम्ब जप्त

बंगाल गावठी बॉम्ब बनवण्याचा आणि फोडण्याचा प्रदेश झालाआहे; मात्र याविरोधात राज्य सरकार बहुतेक वेळा निष्क्रीयच रहाते आणि कधीतरी दाखवण्यासाठी कारवाई करते ! त्यामुळे केंद्र सरकारने अशा देशविरोधी कृत्यांच्या विरोधात हस्तक्षेप करत कारवाई केली पाहिजे !

उपराष्ट्रपती ९ जानेवारीला गोवा भेटीवर

उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू ९ जानेवारी या दिवशी गोवा विधानसभेच्या ‘विधीमंडळ दिवस’ कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी गोव्यात येत आहेत.

राजस्थान येथील श्री देवनारायण मंदिराच्या भूमीपूजनासाठी दूध, दही आणि तूप अशी एकूण ११ सहस्र लिटर सामुग्री वापरल्याने प्रसारमाध्यांची टीका

हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ते कृती करत असतील, तर प्रसारमाध्यमांना पोटशूळ का उठतो ?

पाकच्या सिंध प्रांतात हिंदु महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला सापडला

पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना जगभरातील हिंदू निष्क्रीय !

नवीन पालिका वटहुकूमाला अखिल गोवा व्यापारी संघटनेचा विरोध : ७ जानेवारीला दुकाने ‘बंद’ ठेवण्याची हाक

अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे.

प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणारच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.