महावितरणाच्या देयकातील गोंधळ अद्यापही कायमच !

एप्रिल आणि मे मध्ये ‘महावितरण’कडून घरोघरी जाऊन ‘मीटर रीडिंग’ घेणे, वीजदेयके पाठवणे बंद होते. आता दळणवळण बंदी जवळपास हटवण्यात आल्यामुळे महावितरणकडून घरोघरी जाऊन ‘रीडिंग’ घेण्यास प्रारंभ झाला असूनही …

हुलजंती (जिल्हा सोलापूर) येथे महालिंगराया यात्रेच्या पालखी सोहळ्यात पोलिसांचा लाठीमार

हुलजंती येथे महालिंगराया यात्रेच्या वेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी पालख्यांसमवेतचे भाविक, तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकार्‍यांसह ७४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता २ सहस्र भाविक करू शकतात ऑनलाईन बुकिंग !

श्री विठ्ठलाचे दिवसभरात २ सहस्र भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनी दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन साजरा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर या दिवशी आठवा स्मृतीदिन छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर साजरा करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली.

कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती !

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर या दिवशी संपली. यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील औषध पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत

सरकारी रुग्णालयांना लागणारा औषधांचा पुरवठा करूनही महाराष्ट्रातील पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत राहिली आहे

पुण्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध केले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.

हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अभय बनसोडे या आरोपीने ओळखीचा अपलाभ घेऊन १३ नोव्हेंबर या दिवशी १७ वर्षीय तरुणीला घरी सोडतो, असे खोटे सांगून ‘लॉज’वर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. बलात्कार्‍यांना तत्काळ आणि कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

देहलीमध्ये जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक

देहली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

कर्नाटकातील किष्किंधामध्ये हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती स्थापन करण्यात येणार

कर्नाटकच्या जगप्रसिद्ध हम्पी येथील ‘हनुमद जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे प्रमुख स्वामी गोविंद आनंद सरस्वती यांनी कर्नाटकच्याच पम्पापूर किष्किंधा येथे भगवान हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती लावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.