काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीकेला प्रत्युत्तर
अचलपूर (अमरावती) – मी योगी आहे आणि माझ्यासाठी (योगींसाठी) राष्ट्र प्रथम आहे. तुमच्यासाठी काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण प्रथम आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशातील भाजप शासनाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे झालेल्या सभेत केले. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी योगी यांच्यावर टीका करतांना म्हटले होते, ‘‘खरा योगी हा ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले तर आम्ही नष्ट होऊ) अशी भाषा वापरणार नाही. ही भाषा आतंकवादी वापरतात.’’ त्याला प्रत्युत्तर देत योगींनी वरील विधान केले.
योगी म्हणाले, ‘‘आपण विभाजित झालो, तर गणपतीपूजेवर आक्रमण होईल, भूमी जिहादच्या अंतर्गत भूमी बळकावल्या जातील, मुलींची सुरक्षा धोक्यात येईल. उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’ किंवा भूमी जिहाद अस्तित्वात नाही.’’