
इंफाळ – मणीपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ११ कुकी आतंकवादी ठार झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम सीमेवर कुकी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर बेछूट गोळीबार केला. त्याला तात्काळ प्रत्युत्तर देतांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी ११ आतंकवाद्यांना ठार मारले. या चकमकीत २ सैनिकही घायाळ झाले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, मणीपूरमधील हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी पोलीस ठाण्याजवळ एक साहाय्य छावणी उभारण्यात आली आहे. या छावणीमध्ये रहाणारे लोक कुकी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते. याआधीही येथे अनेकदा आक्रमणे झाली आहेत. या आतंकवाद्यांनी सैनिकांसारखा गणवेश परिधान केला होता. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा होता.
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !