
पुणे – माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलतभाऊ शेखर पारगे यांच्या डोणजे (ता. हवेली) येथील जिव्हाळा फार्महाऊसवर ५ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता कोयत्याने आक्रमण करण्यात आले. यामध्ये शेखर पारगे गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. शाब्दिक भांडणातून आक्रमण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चारही आरोपी पसार झाले असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडीतील जिव्हाळा फार्महाऊसमध्ये शेखर पारगे मित्रांसह मद्यपान करत होते. तेथे त्यांची त्याच हॉटेलमध्ये मद्यपान करत जेवणारे शाकीर शेख, सज्जद शेख आणि इतर दोघे यांसह शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग धरून आरोपींनी शेखर यांच्यावर आक्रमण करून पळ काढला.
या आक्रमणामागे ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे. जिव्हाळा फार्महाऊसला कुठल्याही प्रकारचा मद्यविक्री किंवा बारचा परवाना नाही. (असे आहे, तर तेथे मद्यपान कसे चालू होते ? यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते ! – संपादक)
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका