यंदाचा अर्थसंकल्प भांडवलदारांना निर्भर करण्यासाठीच ! – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे मेट्रोसाठी कोणतीही भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये नाही, असे सांगत यंदाचा अर्थसंकल्प भांडवलदारांना निर्भर करण्यासाठीच केला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

पालघर येथे शाळेत जीन्स घालून येणार्‍या ५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस !

विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता ! राज्यातील सर्वच शाळांमध्ये शासनाने कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे न घालणे बंधनकारक करावे !

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांचा शिवसेनेत, तर गटनेते मंदार हळबे यांचा भाजपमध्ये प्रवेश

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, तर २ फेब्रुवारी या दिवशी मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

मालाड (मुंबई) येथील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत संपूर्ण सेट भस्मसात

येथील मालाड भागातील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळी २ फेब्रुवारी या दिवशी दुपारी आग लागली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणार्‍या या चित्रपटाच्या ‘क्रोमा शूट’साठी मुंबईत सेट उभारण्यात आला होता. अभिनेता सूर्या एका दृश्याचे चित्रीकरण करत होता. तेवढ्यात सेटला आग लागली.

प्रतिवर्षी २६ जुलैला वृद्धांच्या सन्मानार्थ दिन साजरा करणार ! – पोप फ्रान्सिस यांची घोषणा

पोप फ्रान्सिस यांनी २६ जुलै हा दिवस आजी आजोबा आणि वृद्ध यांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची घोषणा केली. ‘नेहमी आपण आजी आजोबांना विसरतो; मात्र त्यांच्याकडे जीवन जगण्याचा मोठा अनुभव मिळू शकतो’, असे ते म्हणाले.

पोलिओ लसीकरणाच्या वेळी बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

पोलिओ लसीकरणाच्या वेळी १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असतांना पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात लसीकरणाच्या वेळी प्लास्टिकचा तुकडा उडून गेला आहे.

तरंगत्या ६ कॅसिनोंकडून कचरा विल्हेवाटीसंबंधीच्या नियमांचा भंग !

नद्यांचे प्रदूषण करून शासनाला महसूल मिळवून देणारे कॅसिनो !

आयकरामध्ये कुठलीही नवीन सुट नाही !

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. प्रथमच ‘पेपरलेस’ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यासाठी  सीतारामन् यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’ ‘टॅब’चा वापर करण्यात आला.

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट !

म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.