यंदाचा अर्थसंकल्प भांडवलदारांना निर्भर करण्यासाठीच ! – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे

पुणे – यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही योजना नाही. कोरोनावर गुणकारी असणारी लस भारतियांना विनामूल्य मिळणार का ? या संदर्भातही अर्थसंकल्पामध्ये काहीच भाष्य नाही. करदात्यांना अर्थसंकल्पामध्ये कोणताही दिलासा मिळालेला नाही. नागपूर आणि नाशिक मेट्रोचा समावेश अर्थसंकल्पामध्ये केला असला, तरीही पुणे मेट्रोसाठी कोणतीही भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये नाही, असे सांगत यंदाचा अर्थसंकल्प भांडवलदारांना निर्भर करण्यासाठीच केला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २०२१- २२ या वर्षीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली.