अपघातग्रस्त डिझेल टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लुटले

यवतमाळ-वणी मार्गावरील शिवारात मध्यरात्री डिझेलच्या टँकरचे टायर फुटले आणि तो उलटला. याची वार्ता शेजारील गावांत पसरल्यावर क्षणार्धात टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लोकांनी लुटून नेले.

मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाविरोधात व्यापक जनजागृतीसह कडाडून विरोध करण्याचा विश्‍वस्तांचा निर्धार !

बेळगाव येथे देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ कर्नाटकच्या वतीने मंदिर विश्‍वस्तांची बैठक.

वर्ष २०५० पर्यंत जगातील ४ पैकी एकाला श्रवणदोष होणार ! – जागतिक आरोग्य संघटना

संसर्ग, वाढता गोंगाट, जीवनशैली, गॅजेटचा वाढता वापर इत्यादी गोष्टींमुळे ही समस्या येऊ शकते, असे यात म्हटले आहे. या समस्येच्या निराकरणासाठी अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा सल्लाही या संघटनेने दिला आहे.

पाकमधील विद्यार्थांना शिकवला जात आहे जिहाद !

व्हिडिओमध्ये हा शिक्षक पंजाबी भाषेत, ‘महंमद पैगंबर यांचा कुणी अवमान केला, तर त्यांची हत्या करा. तुम्ही काश्मीरमधील मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी सिद्ध व्हा आणि भारताच्या विरोधात युद्ध करा’, असे तो शिकवत असल्याचे दिसत आहे.

वसतीगृहातील महिलेसमवेत अपप्रकार केल्याच्या घटनेत तथ्य नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

जळगाव येथील आशादीप वसतीगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर !

कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता

नागपूर ते भाग्यनगर येथे कत्तलीसाठी नेणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता कळंब येथील पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून २ मोठ्या ट्रकमधून रात्री साधारणतः १ वाजता ४२ गोवंशियांचे प्राण वाचवले.

पोलीस कर्मचार्‍याने बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण केल्याने विवाहित महिलेची आत्महत्या !

महिलांनो कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे सबल बना ! यासाठी साधना आणि स्वरक्षण प्रशिक्षण घ्या. आत्महत्या करण्यापेक्षा अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी रणरागिनी बनून उभे रहा !

(म्हणे) ‘श्रीराम मंदिराचा निधी बळजोरीने घेतात !’ – आमदार नाना पटोले

विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ‘श्रीराम मंदिराच्या निधीविषयी बोलतांना मंदिरासाठी समाजातून बळजोरीने निधी गोळा केला जात आहे’, अशी मुक्ताफळे सभागृहात उधळली.

चीनचा शिनजियांगमधील उघूर मुसलमानांना नोकरीनिमित्त दुसर्‍या प्रांतात पाठवण्याचा प्रयत्न !

यामुळे शिनजियांगमधील मुसलमानांची संख्या न्यून होत आहे. बीबीसीने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने दावा केला आहे की, याद्वारे उघूर मुसलमानांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

७ मार्च या दिवशी स्वित्झर्लंडमध्ये बुरखा बंदीसाठी सार्वमत घेतले जाणार !

स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यावर बंदी घालण्याची सिद्धता केली जात आहे. यासंदर्भात ७ मार्च या दिवशी देशात सार्वमत घेतले जात आहे.