कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता

४ धर्मांधांना अटक

कळंब (यवतमाळ), ४ मार्च (वार्ता.) – नागपूर ते भाग्यनगर येथे कत्तलीसाठी नेणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता कळंब येथील पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून २ मोठ्या ट्रकमधून रात्री साधारणतः १ वाजता ४२ गोवंशियांचे प्राण वाचवले. या प्रकरणी ४ धर्मांधांना अटक करून ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. (किती पोलीस हिंदुत्वनिष्ठांनी गोरक्षणाचे कार्य केल्यावर त्यांचे कौतुक करतात ? – संपादक)