बीजिंग (चीन) – चीनने मुसलमानबहुल शिनजियांगमधील उघूर मुसलमानांना नोकरीच्या निमित्ताने शिनजियांग प्रांतातून दुसर्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. यामुळे शिनजियांगमधील मुसलमानांची संख्या न्यून होत आहे. बीबीसीने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे.
चीनने दावा केला आहे की, याद्वारे उघूर मुसलमानांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.