पोलीस कर्मचार्‍याने बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण केल्याने विवाहित महिलेची आत्महत्या !

  • असे पोलीस महिलांचे संरक्षण काय करणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा देणे अपेक्षित आहे.

  • महिलांनो कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे सबल बना ! यासाठी साधना आणि स्वरक्षण प्रशिक्षण घ्या. आत्महत्या करण्यापेक्षा अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी रणरागिनी बनून उभे रहा !

धाराशिव – येथील पोलीस कर्मचार्‍याने सप्टेंबर २०२० पासून वेळोवेळी बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण केल्याने एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर यांच्याविरोधात धाराशिव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळी दोन चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या असून त्यात लिहिले आहे की, ‘माझ्या आत्महत्येला हरिभाऊ कोळेकर हा उत्तरदायी आहे. त्यानेच माझे वाटोळे केले. त्याने घरी येऊन माझ्यावर बलात्कार केला आणि त्या आधारे मला सतत बंदुकीचा धाक दाखवून धमकावत होता. यात माझ्या पतीचा काहीही दोष नाही.’