आय.ए.एस् अधिकारी दांपत्य टिना डाबी आणि अथर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

हिंदु महासभेने ‘लव्ह जिहाद’ म्हणून आरोप केलेल्या आय.ए.एस्. अधिकारी टिना डाबी आणि अथर खान यांच्या विवाहाच्या २ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटासाठी येथील कुटुंब न्यायालयात अर्ज केला आहे. घटस्फोटामागील कारण समजू शकलेले नाही.

उत्तर भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा बंधने  !

देशात कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत संपूर्ण दळणवळण बंदी नसली, तरी अनेक बंधने घोषित करण्यात आली आहेत.

कार्तिकी यात्रेला नियम पाळत अनुमती द्यावी !

आगामी कार्तिकी यात्रेला शासनाने सर्व नियम पाळत अनुमती द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

(म्हणे) ‘मुसलमानांना राजकारणामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असू नये, या खोटेपणावर हिंदुत्व आधारित ! – असदुद्दीन ओवैसी

‘हिंदुत्वा’ची स्वतःला हवी तशी व्याख्या करण्यात किंवा अर्थ काढून त्यावर टीका करण्यात हुशार असणारे ओवैसी !

कर्नाटकमध्ये होणार्‍या गोहत्या बंदी कायद्याची गोव्यातील गोमांस भक्षकांनी घेतली धास्ती !

कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी प्रखर गोभक्त तथा गोवंशियांच्या रक्षणासाठी झटणारे भाजपचे नूतन गोवा प्रभारी आणि कर्नाटकमधील चिक्कमंगळुरूचे आमदार सी.टी. रवि यांचा मोलाचा हातभार आहे.

भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना घेराव

आज शासकीय कर्मचार्‍यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !

शिरोडा येथे फोंडा कीर्तन विद्यालयाचा आज चक्रीकीर्तन कार्यक्रम

गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा आणि शांताप्रसाद अद्वैतानंद न्यास शिरोडा यांच्या वतीने २२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता शांताप्रसाद अद्वैतानंद सभागृह, चिकनगाळ, शिरोडा येथे चक्रीकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

कोकण रेल्वेमार्गावर हुंबरठ येथे रेल्वेची धडक बसून महिलेचा मृत्यू

कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.

अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात ८ जण घायाळ

अमेरिकेतील विस्कॉन्सिन भागातील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह ८ जण घायाळ झाले असून पोलीस गोळीबार करणार्‍याचा शोध घेत आहेत.

भाजप नेत्यांचे विवाह ‘लव्ह जिहाद’मध्ये मोडत नाहीत का ?

मी भाजपच्या नेत्यांना विचारू इच्छितो की, ज्या भाजप नेत्यांच्या परिवारातील लोकांनी अन्य धर्मांमध्ये विवाह केले आहेत, ते ‘लव्ह जिहाद’च्या परिघात येत नाहीत का ? असा प्रश्‍न छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपला विचारला आहे.