आय.ए.एस् अधिकारी दांपत्य टिना डाबी आणि अथर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

जोधपूर (राजस्थान) – हिंदु महासभेने ‘लव्ह जिहाद’ म्हणून आरोप केलेल्या आय.ए.एस्. अधिकारी टिना डाबी आणि अथर खान यांच्या विवाहाच्या २ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटासाठी येथील कुटुंब न्यायालयात अर्ज केला आहे.

 (सौजन्य : वनइंडिया हिन्दी)

घटस्फोटामागील कारण समजू शकलेले नाही. वर्ष २०१५ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये टिना पहिल्या क्रमाकांवर आणि अथर दुसर्‍या कामांकावर उत्तीर्ण झाले होते. ते प्रशिक्षणाच्या वेळी एकत्र असतांना त्यांच्यात प्रेम निर्माण होऊन त्यांनी विवाह केला होता.