अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात ८ जण घायाळ

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील विस्कॉन्सिन भागातील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह ८ जण घायाळ झाले असून पोलीस गोळीबार करणार्‍याचा शोध घेत आहेत.

ज्या वेळी आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोचले, तेव्हा गोळीबार करणारा तेथून पळून गेला. गोळीबार करणारा २० ते ३० वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.