(म्हणे) ‘मुसलमानांना राजकारणामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असू नये, या खोटेपणावर हिंदुत्व आधारित ! – असदुद्दीन ओवैसी

‘हिंदुत्वा’ची स्वतःला हवी तशी व्याख्या करण्यात किंवा अर्थ काढून त्यावर टीका करण्यात हुशार असणारे ओवैसी !

असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – केवळ एका समाजाकडे राजकीय शक्ती एकवटली जावी आणि मुसलमानांना राजकारणात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असू नये, या खोट्या सूत्रावर रा.स्व. संघाचे हिंदुत्व आधारलेले आहे.

खोट्या हिंदुत्वनिष्ठ संघाच्या विरोधात आव्हान उभारण्याचे काम संसद आणि विधानसभा यांमध्ये मुसलमान समाजाच्या प्रतिनिधींच्या अधिकाधिक उपस्थितीतून होईल, असे ट्वीट एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ओवैसी यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत ५ जागांवर विजय प्राप्त केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केले आहे.