नवी देहली – देशात कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत संपूर्ण दळणवळण बंदी नसली, तरी अनेक बंधने घोषित करण्यात आली आहेत. देहली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे, तर बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये हे प्रमाण घटलेले आढळून आले.
हरियाणामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशातील ५ जिल्ह्यांत रात्रीच्या वेळी दळणवळण बंदी रहाणार आहे. गुजरातमध्ये कर्णावती, सूरत, बडोदा आणि राजकोट या जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी रहाणार आहे. राजस्थानच्या ३३ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.