ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे दोघा आधुनिक वैद्यांकडून अल्प मूल्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार !

सर्वत्र रुग्णांची लूट चालू असतांना अल्प मूल्यात उपचार देणारे असे आधुनिक वैद्य, हे वैद्यकीय खात्याचे भूषणच होय ! सर्वत्रच्या आधुनिक वैद्यांनी यांचा आदर्श घ्यावा !

ऊसाचे पैसे द्या अन्यथा कारखान्यांसमोर पीपीई किट घालून आंदोलन करणार ! – रयत क्रांती संघटनेची चेतावणी

अनेक कारखान्यांनी कोरोनाचे कारण देत ४ मासांपासून शेतकर्‍यांची देयके थकवली आहेत. शेतकर्‍यांच्या ऊसाची थकित देयके दिली नाहीत, तर कारखान्यांसमोर पीपीई किट घालून आंदोलन करू, अशी चेतावणी रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी चीनमध्ये गायीचे दूध पिण्यासाठी आग्रह !

कुठे गायीच्या दुधाचे महत्त्व उमगलेला चीन, तर कुठे गायीचे रक्षण करू न शकणारा भारत !

राष्ट्रपुरुष आणि मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची अपकीर्ती केल्याप्रकरणी पुणे येथील सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंद

राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सामाजिक माध्यमावर अपकीर्ती केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

उंब्रज परिसरात (जिल्हा सातारा) अनावश्यक फिरणार्‍या नागरिकांच्या गाड्या पोलिसांकडून कह्यात

नागरिक काही ना काही कारणाने घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.

कुसुंबी (जिल्हा सातारा) येथे लग्न समारंभात निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने कारवाई

कुसुंबी ग्रामपंचायतीने आयोजकांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

औंध येथील वृद्ध दांपत्याला लुटणारी टोळी कह्यात !

दांपत्याकडे नर्सिंग ब्युरोकडून पूर्वी केअरटेकर म्हणून काम करणार्‍यानेच हा गुन्हा केला असल्याचे समोर आले आहे.

देहलीमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काळाबाजार करणार्‍या चौघांना अटक

४१९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त

उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार

गोशाळेत गायी आणि अन्य जनावर यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

आझमगड (उत्तरप्रदेश) येथील शवविच्छेदनगृहातच ४ दिवस पडून राहिलेला मृतदेह उंदरांनी खाल्ला !

राज्याच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह ४ दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता.