देहलीमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काळाबाजार करणार्‍या चौघांना अटक

४१९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त

उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार

गोशाळेत गायी आणि अन्य जनावर यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

आझमगड (उत्तरप्रदेश) येथील शवविच्छेदनगृहातच ४ दिवस पडून राहिलेला मृतदेह उंदरांनी खाल्ला !

राज्याच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह ४ दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता.

८ मेच्या दिवशी चीनचे नियंत्रण गमावलेले रॉकेट पृथ्वीवरील नागरी भागांत कोसळण्याची शक्यता ! – अमेरिका

चीनने अवकाशात पाठवलेले रॉकेट समुद्रात कोसळणार होते मात्र त्याआधीच नियंत्रण गमावल्याने ते पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तिसर्‍या लाटेत मुलांना संसर्ग झाल्यास तुम्ही काय करणार ?

जर उद्या परिस्थिती बिघडलीच आणि कोरोना रुग्ण वाढले, तर तुम्ही काय कराल ? तिसर्‍या लाटेत मुलांवरही परिणाम होऊ शकतो, असे तज्ञांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेत काय करायला हवे, याची सिद्धता आताच करावी लागेल.

अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ७ किलो युरेनियम बाळगणार्‍या दोघांना अटक !

युरेनियम खरेदी करण्यासाठी कुणी इच्छुक आहे का, याचा ते दोघे शोध घेत असतांनाच पथकाने धाड टाकली.

केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला

केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत !

कोरोनाचा संसर्ग झाल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू रुग्णालयात भरती

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याच्या माहितीनंतर येथे मोठ्या संख्येने त्यांचे भक्त गोळा झाले.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एकाचे आत्मसमर्पण

कानिगाम भागात हे आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर या परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवण्यात आली.