देहलीमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काळाबाजार करणार्‍या चौघांना अटक

४१९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त

नवी देहली – देहली पोलिसांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काळाबाजार करण्यार्‍या  ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४१९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त करण्यात आले आहेत. एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही टोळी ७० सहस्र रुपयांना विकत होती. त्यांच्याकडे ९ आणि ५ लिटर क्षमतेचे ३२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आढळून आले. तसेच थर्मल स्कॅनर आणि ‘एन् ९५’ मास्कचा साठाही आढळून आला. चौकशी केल्यानंतर मंडी विलेज येथील खुल्लर फार्म येथे आणखी साठा असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी धाड टाकून ३८७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हस्तगत केले. पोलिसांनी गौरव सिंग, सतीश सेठी, विक्रांत आणि हितेश अशा चौघांना अटक अटक केली आहे.