कुसुंबी (जिल्हा सातारा) येथे लग्न समारंभात निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने कारवाई


सातारा, ६ मे (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभ आदींवर जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढून निर्बंध घातले आहेत. जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावातील एका लग्न समारंभास आदेशात नमूद केलेल्या संख्येहून अधिक लोक उपस्थित राहिल्याचे आढळल्याने कुसुंबी ग्रामपंचायतीने आयोजकांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास याप्रकारेच कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने कळवले आहे.