वीजदेयकांच्या थकबाकीमुळे महावितरण आस्थापनापुढे वीज खंडित करण्याचाच पर्याय बाकी !

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे रहाणे एवढाच पर्याय आस्थापनाकडे आहे; म्हणून देयक भरले, तरच वीज मिळेल एवढाच पर्याय सध्या आहे.

भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला आळा घालण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न व्हावेत ! – विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे निवेदन

प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कॉफी शॉप’ नावाचा नवा प्रकार इचलकरंजी परिसरात नव्याने उदयास आला आहे. पोलिसांच्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला. याचे मूळ ‘व्हॅलेंटाईन डे’मध्येच आहे. तरी अशा प्रकारच्या ‘कॉफी शॉप’ला आळा घालावा.

म्यानमारमध्ये सैन्याच्या बंडखोरीवरून नागरिकांचे चिनी दूतावासासमोर आंदोलन

म्यानमारमध्ये सैन्याकडून करण्यात आलेल्या बंडखोरीच्या विरोधात सहस्रो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदेलन चालू केले आहे. येथील नागरिक सैन्य हुकूमशाह ‘कमांडर इन चीफ जनरल’ मिन आँग हलेइंग यांच्याविरोधात मोर्चे काढत आहेत.

पुणे येथील अधिकोषाची २ कोटी ६९ लाखांची फसवणूक करणार्‍या माजी नगरसेवकासह १० जणांवर गुन्हा नोंद !

‘श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेड’च्या विशालनगर, पिंपळे निलख येथील शाखेत बनावट कागदपत्रे सिद्ध करून अधिकोषाची २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत घडली आहे.

मंगळुरू (कर्नाटक) येथील साधिका कु. माधवी पै पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण

येथील साधिका कु. माधवी पै या पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापालाच्या (सी.ए.ची) अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. दोन ग्रुपमध्ये एकाच वेळी उत्तीर्ण होऊन त्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. मंगळुरूच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांची ती सर्वांत मोठी कन्या आहे.

भारत उपग्रहाद्वारे श्रीमद्भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार

खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह ‘सतीश धवन सॅटेलाईट’ याच्या समवेत श्रीमद्भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि २५ सहस्र भारतीय नागरिकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहेत.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना ‘मास्क’ न वापरल्याने दंड

‘मास्क नाही, प्रेवेश नाही’ या राज्यशासनाच्या धोरणाचे उल्लंघन होत असल्याचे पालघरमध्ये समोर आले असून ‘मास्क’ बांधला नाही म्हणून पालघरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना २०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

मुख्य सूत्रधाराला अटक न केल्यास आमरण उपोषण करण्याची कुटुंबियांनी दिली चेतावणी

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अद्याप अटक का होत नाही, अन्य गुन्ह्यांतील आरोपी सापडतात, नाहीच सापडले तर पोलीस सर्व यंत्रणा कामाला लावून त्यांना पकडतातच. असे असतांना बोठेच्या संदर्भात असे का होत नाही ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या.

रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दलाचे मोर्चाद्वारे निवेदन

रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी.