मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असल्याने न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगा ! – उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

यापूर्वीच अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. राज्यातील जनतेला मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असतांना प्रशासन आणि पोलीस बहिरे झाले आहेत का ?

इंधनाअभावी एस्.टी.चा वेग मंदावला

इंधनासाठी पैसे पाठवू न शकल्यामुळे जिल्ह्यांतील सर्वच आगारातील डिझेल संपले आहे. परिणामी इंधनाअभावी जिल्ह्यातील एस्.टी.बसगाड्यांचा वेग मंदावला आहे.

रुग्णावर उपचार करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी पुणे येथील आधुनिक वैद्याला अटक

असे लाचखोर वृत्तीचे आधुनिक वैद्य रुग्णावर कसे उपचार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्यासाठी ‘सोनेरी ग्रुप’चे ‘भीक मागा आंदोलन’

अशी मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी मुंबई अन् पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

रंगपंचमीच्या दिवशी असे अपप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

पेण येथील अँबिशन मंडळाच्या माध्यमातून सिंहगडाची स्वच्छता मोहीम

प्रतिमास गड स्वच्छता मोहीम राबवून युवा पिढीला गड संवर्धनासाठी उद्युक्त करणार्‍या अँबिशन मंडळाचे अभिनंदन !

राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या निलंबित सहसंचालकास अटक !

पुणे जिल्ह्यात बनावट दस्तऐवजाच्या आधारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांस ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

पुणे येथील सिस्का आस्थापनाच्या गोदामाला भीषण आग

वाघोलीतील कटकेवाडी येथील सिस्का आस्थापनाच्या गोदामाला २३ मार्चच्या रात्री ८ वाजता आग लागली. हे गोदाम अनुमाने ८ ते १० सहस्र चौरस फुटांचे आहे.

नगरपालिकेकडून थकित करवसुलीसाठी दुकान गाळे ‘सील’

कराड नगरपालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांच्या थकीत करवसुलीसाठी कठोर पावले उचलत ‘नोटीस’ देऊन दुकान गाळे ‘सील’ करण्यास प्रारंभ केला आहे.

संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही ? याविषयी २ आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा ! – मुंबई उच्च न्यायालय

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले; मात्र या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.