मद्रास उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

‘उच्च न्यायालयाची भाषा संवेदनशील असावी’, तर ‘निवडणूक आयोगानेही आदेशाचे पालन करावे’ !

नवी देहली – देशातील नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याने मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवून ‘खुनाचा गुन्हा नोंदवायला हवा’, अशा शब्दांत फटकारले होते. याविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाची प्रतिक्रिया अतिशय तीव्र असून घटनेनुसार ही भाषा संवेदनशील असायला हवी होती. तसेच निवडणूक आयोगानेदेखील आदेशाचे पालन करायला हवे होते. मद्रास उच्च न्यायालय अशा प्रकारच्या प्रतिक्रियेला आपल्या निर्णयाचा भाग बनवू शकत नाही.