केंद्रीय विज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी ‘एम्स’ला ३ लाख रुपये !
केवळ गायत्री मंत्रच नव्हे, तर अन्य मंत्रांचा अन्य कोणत्या आजारांच्या निर्मूलनासाठी उपयोग होतो, याचेही आता संशोधन केले पाहिजे !
नवी देहली – केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ? यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांंचा निधी दिला आहे.
या रुग्णालयात करण्यात येणार्या या संशोधनासाठी कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या २० जणांची निवड केली जाणार आहे. यांपैकी एका गटाला नेहमीचे वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत, तर दुसर्या गटाला नेहमीच्या उपचारांसमवेत आयुर्वेदीय औषधे, गायत्री मंत्राचे पठण आणि योगासने करायला सांगितली जातील. त्यानंतर दोन्ही गटाच्या रुग्णांवर काय परिणाम झाले आहेत, हे पडताळले जाईल. रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स तैनात असतील. साधारण २-३ मास हे संशोधन चालेल. या काळात रुग्णांना नेहमीच्या औषधांसमवेत पतंजलीचे ‘कोरोनील’ हे आयुर्वेदीय औषधही देण्यात येईल. या उपचारांनी कोरोना रुग्णांना काही साहाय्य होते का, हे पडताळले जाईल, अशी माहिती डॉ. रूची दुआ यांनी दिली.