March For Bangladeshi Hindus : वॉशिंग्टन (अमेरिका) येथे हिंदु संघटनांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ काढला मोर्चा

हिंदूंच्या रक्षणासाठी अमेरिका सरकारने पावले उचलण्याची केली मागणी !

वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकी लोकांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसपासून यूएस् कॅपिटलपर्यंत (संसदेपर्यंत) मोर्चा काढला. ‘आम्हाला न्याय हवा आहे आणि हिंदूंचे रक्षण करावे’ अशा घोषणा देत शांततापूर्ण निदर्शकांनी बायडेन प्रशासन आणि आगामी ट्रम्प प्रशासन यांना बांगलादेश सरकारला हिंदूंच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यास सांगण्याची विनंती केली. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेने बांगलादेशातून कपडे आयात न करण्याची केली मागणी !

या मोर्चाचे आयोजन करणार्‍या संघटनांनी अमेरिकी आस्थापनांनी बांगलादेशातून कपडे खरेदी करणे थांबवावे, अशी मागणी केली. बांगलादेश अमेरिकेला कपड्यांची निर्यात करण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेतील हिंदू तेथील सरकारकडे अशी मागणी करतात, तशीच मागणी भारतातील किती हिंदु संघटना भारत सरकारकडे करत आहेत ?