अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर ८ विद्यार्थी घायाळ

कोलोरॅडो येथील एस्टीईएम् या शाळेत एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात अन्य एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर ८ विद्यार्थी घायाळ झाले.

‘अ‍ॅमेझॉन’कडून भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांंची ‘ऑनलाइन’ विक्री चालू !

‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाचा हिंदुद्वेष कायम ! सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान करणार्‍या आस्थापनांवर भाजप सरकारने कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम आहे ! जगात हिंदूंचे परिणामकारक हिंदूसंघटन झाले, तरच अशा प्रकारची धर्महानी टाळली जाईल, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित

केवळ एखाद्या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केल्याने आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत, हे लक्षात घ्यायाला हवे ! अशा कृतींपेक्षा ‘आतंकवाद्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना नष्ट केल्याने आतंकवाद संपणार आहे’, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील तो सुदिन !

अमेरिकेत शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील ओहियो प्रांतातील वेस्ट चेस्टर भागात २८ एप्रिलच्या रात्री एका शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये ३ महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे.

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील ज्यूंच्या प्रार्थनास्थळामध्ये झालेल्या गोळीबारात १ जण ठार

येथील सॅन दिएगोजवळ ज्यू धर्मियांच्या एका प्रार्थनास्थळामध्ये (सिनेगॉगमध्ये) १९ वर्षीय तरुणाने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले.

अमेरिकेकडून पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध

अमेरिकेतील कायद्याच्या अंतर्गत व्हिसावर प्रतिबंध घालता येणार्‍या जगातील १० देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे.

बाळाला त्याच्या १ वर्षापर्यंत दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष दाखवू नका ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेला उशिरा सुचलेले शहाणपण ! वयाच्या १ वर्षाच्या आधी मुलांना दूरचित्रवाणी संच, भ्रमणभाष संच यांसारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्क्रीनशी ओळखच करून देऊ नये, अशा स्पष्ट सूचना जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच दिल्या आहेत.

आतंकवादाच्या धोक्यामुळे पाकमध्ये जाऊ नका ! – अमेरिकेचे तिच्या नागरिकांना आवाहन

पाकमधील आतंकवादी कारवाया पहाता अमेरिकेने तिच्या नागरिकांना पाकमध्ये जाण्याविषयी पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

विदेशातून स्वतःच्या देशात पैसे पाठवण्यामध्ये भारतीय सर्वांत पुढे !

जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार विदेशातून स्वतःच्या देशात पैसे पाठवण्यामध्ये भारतीय सर्वांत पुढे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वर्ष २०१८ मध्ये प्रवासी भारतियांनी ७९ अब्ज डॉलर (५४ सहस्र ६४५ कोटी रुपयांहून अधिक)….

अमेरिकेच्या ‘पेंटागॉन’कडून पुन्हा एकदा भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणीचे समर्थन

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटागॉन’ने पुन्हा एकदा भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीचे समर्थन केले. यापूर्वी अमेरिकेची ‘अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘नासा’ने ‘भारताने केलेल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे ….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now