अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांची बांगलादेश सरकारला विनंती

वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशात हिंदू आणि इतरांविरुद्ध चालू असलेला हिंसाचार स्वीकारता येणार नाही. तो त्वरित थांबवावा. मी बांगलादेश सरकारला शांततेने तणाव न्यून करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची विनंती करतो, असे विधान अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी केले आहे. इस्कॉनचे चिन्मय प्रभु यांच्या अटकेनंतर बांगलादेशात नुकत्याच झालेल्या अशांततेबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
🇺🇸US Congressman Raja Krishnamoorthi Urges Bangladesh government to stop Attacks on Hindus Immediately!
👉It is evident that the attacks on #Hindus in #Bangladesh are happening with the government’s orders, and hence the government will never stop them. Therefore, the US… pic.twitter.com/rEcAMdeQCd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 7, 2024
कृष्णमूर्ती पुढे म्हणाले की, बांगलादेश सरकारने शांततापूर्ण निषेध आणि योग्य कायदेशीर प्रतिनिधित्वाच्या अधिकारांसह मानवी हक्क अन् मूलभूत स्वातंत्र्य यांचे समर्थन आणि संरक्षण केले पाहिजे. सध्याचा तणाव अल्प करण्यासाठी असे उपाय महत्त्वाचे आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदूंवर होणारी आक्रमणे सरकारच्या आदेशानेच होत असल्याने सरकार कधीही ती रोखणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सरकारने बांगलादेशात धडक कारवाई करावी आणि यासाठी कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या सरकारला सांगावे ! |
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !